Home Uncategorized पांडवकालीन विमलेश्वर

पांडवकालीन विमलेश्वर

कोकणात बऱ्याच ठिकाणी पांडवकालीन स्थळेआढळतात, याच मालिकेतील देवगड तालुक्यातील वाडा येथे वसलेले पांडवकालीन लेणी वजा विमलेश्वर मंदिर हे पर्यटकांचे आकर्षण बनले आहे!

देवगड विजयदुर्ग रोडवर फणसे- पडवणे रस्त्याच्या बाजूला हे देऊळ वसले आहे .देऊळ जांभ्या एकसंध दगडात कोरले आहे. देवळाची बांधणी कोरीव लेणी पद्धतीची आहे. देवळाला उतरण्यासाठी दोन बाजूने प्रशस्त पायऱ्या आहेत .सतत वाहणारा झरा देवळाच्या बाजूला आहे ,झऱ्याचे पाणी दोन कुंडात पडते. एक कुंडात हात-पाय धुतात , वरच्या कुंडात पिण्याचे पाणी आहे .वाड्यातील निसर्गरम्य परिसरात विमलेश्वर देवस्थान वसले आहे .माडा पोफळीच्या बागा ह्या परिसरात दिसून येतात. विमलेश्वर मंदिराची लेणी देखणी आहे .या मंदिराची कला ही सर्वसामान्य पांडव मंदिराप्रमाणेच आहे. हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत खोदले आहे. दगडात कोरलेले दोन प्रचंड हत्ती देखणे आहेत , हत्तीवर माहूरची शिल्पे आहेत .अशी सुंदर शिल्पे लेणी पाहायलाच हवी !मंदिरात शिवलिंग आहे .प्रवेशद्वार व सभामंडप यापेक्षा गाभारा उंच आहे. या पिंडीवर पडणारे पाणी अथवा इतर पाणी एका भोकातून निघून जाते ;मात्र ते कोठे जाते याचा पत्ता नाही !मंदिराच्या डोक्यावर पांडवांची शिल्पे आहेत ,देवळाचे नक्षी काम बिघडू न देता सिमेंटीकरण ग्रामस्थांनी केले आहे. देवळात विविध उत्सव साजरे केले जातात महाशिवरात्रीला दर्शनासाठी मोठी झुंबड उडते.

पांडवकालीन विमलेश्वर मंदिर

*भीमा ची पुंजी-

या देवळांची जोडून भिमाच्या पूजेची हकिकत जोडली आहे. देवळापासून जवळच फार मोठ्या दगडांचा ढिग ठेवण्यात आला आहे, या दगडाचे एका रात्रीत सागरात समर्पण करणाऱ्याला मोठा धनलाभ होईल असे सांगितले जाते .त्या दगडांना भिमाची पुंजी असे म्हणतात.

विमलेश्वर मंदिर शिल्प

विमलेश्वर मंदिराचा निसर्गरम्य परिसर व वाडा गाव हे प्रसिद्ध लेखक श्रीपाद काळे यांच्या कथा -कादंबऱ्या तून वाचकांना सापडते .श्रीपाद काळे विमलेश्वर याचे पूजक होते. काही वर्षांपूर्वीपासून या देवळाचे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे ,असे देखणे प्रवेशद्वार पाहायलाच हवे! या देवळाचा प्रसन्न सभामंडप आहे ,बाहेर कितीही उन्हाळा असला तरी देवळात थंडावा आहे .त्या देवळात महिलांना प्रवेश नाही ;मात्र कुमारिका, वृद्ध स्त्रिया देवळात जाऊ शकतात !तालुक्यातील कुणकेश्वर याबरोबरच विजयदुर्गाचं रामेश्वर विमलेश्वर ही शंकराची मंदिरे पुरातन असल्याने भाविकांनी याबरोबरच येथेही रीघ लागते! या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर तिथे तुम्हाला प्रचंड वटवाघळे बघायला मिळतील, त्याच प्रमाणे ह्या मंदिराच्या परिसरामध्ये कातळ खोद शिल्पे आहेत.

पांडवकालीन विमलेश्वर मंदिरातील हत्ती

याच परिसरातून पुढे वेळगिवे येथे गेल्यावर रामेश्वर व आयोगाचे मंदिर लागते ही मंदिरे जमिनीखाली असून अशीच कोरीव लेणी आहेत .या मंदिराचे संशोधन व्हायला हवे !याची फारशी माहिती प्रकाशनात नाही .अलोबाचे मंदिर एका रात्रीत बांधावे अशी देवाने अट घातल्याचे ग्रामस्थ सांगतात .अतिशय पुरातन शिल्प या परिसरात आहेत, रामेश्वर मंदिरातच विहीर आहे. मंदिरात मिट्ट अंधार असतो केवळ महत्त्वाच्या दिवशी लाईट लावले जातात!

पांडवकालीन विमलेश्वर मंदिरातील पाण्याचा झरा

Bhavanahttps://learnlooper.com
A girl from konkan region.

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

One piece under 600 for women

You all know about how girls are craxy about shopping , so here i am introducing with your budget dresses which will...

Top products for cats

we all love cats. We all have cats in our home of various kind, but sometimes we forget about them due to...

Top 5 most useful women’s product !

Top 5 most useful women's products !Hey all womaniyas there! I am going to tell you 5 amazing products that will change...

पांडवकालीन विमलेश्वर

कोकणात बऱ्याच ठिकाणी पांडवकालीन स्थळेआढळतात, याच मालिकेतील देवगड तालुक्यातील वाडा येथे वसलेले पांडवकालीन लेणी वजा विमलेश्वर मंदिर हे...

Recent Comments