Home Uncategorized हे ठेवून दे, नंतर उपयोगी पडेल!

हे ठेवून दे, नंतर उपयोगी पडेल!

नमस्कार शीर्षक वाचून कदाचित सगळेच विचारात पडले असतील की नक्की काय ठेवून दे ?आणि काय उपयोगी पडेल? तर निव्वळ तुमची उत्सुकता वाढावी म्हणून दिलेले हे शीर्षक!आता मी काही कोणी खूप मोठी लेखिका वगैरे नव्हे पण अनुभव नामाचा गुरु सगळ्यांनाच लाभतो व आपण सगळीच शिकत जातो तर त्यातूनच जे सुचलं जे अनुभवलं ते मांडवस वाटलं !

सगळ्यांच्याच घरी एक साफसफाईचा दिवस नक्कीच असतो, जेव्हा सगळेजण घराची साफसफाई करण्यात व्यस्त असतात. कोण कोळ्याची जळमटं काढत असतं, कोण आपलं कपाट लावत असतं ,तर कोण कोपऱ्या मधील धुळ साफ करत असतं .हे सर्व करतानाच एखादी जुनी लहानपणी ची बाहुली ,लहानपणी धूम धूम करून चालवलेली गाडी ,काही बडबड गीतांची पुस्तके ,जुने कपडे कोरे कागद अशा बऱ्याच गोष्टी दिसतात ज्या काळाच्या ओघात नजरेच्या आड झालेल्या असतात.

बरं आपली आई यावेळी महिनोनमहिने तशीच पडलेली वस्तू समजा एखादा जुना कापड असेल तर म्हणणार “हे ठेवून दे !नंतर उपयोगी पडेल!”, नंतर म्हणा काही महिन्यांनी त्याच वस्तूच्या बाबतीत हेच वाक्य पुन्हा ऐकायला मिळणार हे नक्की !बर “विचारलं कशाला ग ?”,”नाही ही ते गोधडीत घालेन म्हणते,” आता तुम्हाला प्रश्न पडला असेल गोधडी म्हणजे काय? तर ही गोधडी साडीचा आवरण घालून ,जुने कपडे वापरून शिवली जाते. कदाचित आपली ही शेवटची पिढी असेल जिला गोधडीची उब माहिती असेल !

एखाद्या जुन्या विषयाची वही सापडली तर सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात ,ते सगळे क्षण पुन्हा जगतो आपण नव्याने! आणि आपल्या ह्या वस्तू मात्र ‘रद्दीत टाक आता काय उपयोग त्याचा?’ या नावावर खपवल्या जातात मात्र तरी पण एखाद्या पाच वर्षाच्या मुलाने स्वतः च चॉकलेट लपवावं तसं आपण जुन्या आठवणी पुन्हा एखाद्या पिशवी जतन करतो .

एखादी बाहुली बघितली तरी तिचे मळकट शरीर, काळवंडलेला चेहरा हे नक्कीच जरी नवीन बाहुली आणायची म्हटली तरी तेच आपल्याला प्रिय असत. कोरे कागद मिळाले तरी आई म्हणते हे ठेवून दे नंतर उपयोगी पडेल! विचारलं का ?तर स्वतःच्या काळामध्ये आपण कसे वह्या बनवायचो, वापरायचो, शाळेला कापडी पिशवी न्यायचो खरंच हे सगळं ऐकून तारक मेहता मधल्या भिडे ची खुप आठवण येते !हमारे पुराने जमाने मे !आठवलं असेल सगळ्यांना !खरं तर घरातली अडघळीच्या खोलीचं हेच ब्रीद असाव “हे ठेवून द्या, नंतर उपयोगी पडेल!”, बालपणीची संगिताची वही ,मराठीची वही ,केलेल्या कविता धूळ खात तिथेच तर पडलेल्या असतात .बघायला गेलं तर आई उपयोगी पडेल म्हणून; आपण वाढदिवसाला उघडलेल्या भेटवस्तू चा कागदसुद्धा जपून ठेवते !

काही अचानक मिळालेल्या वस्तू आपल्याला सुखद क्षण देतात, काही वस्तू पश्चाताप करायला लावतात, काही वस्तू दुःख देतात ,खरंतर अडघळ ही अडघळ नसतेच मुळी ,माणसाची सवय असते ती !वर्षानुवर्षे सगळ गोळा करत बसायची नंतर उपयोगी पडेल या आशेने उराशी बाळगायची, बरं काही वस्तू मनात नसताना सुद्धा आई-बाबा द्यायला सांगतात, तेव्हा त्या बदली मिळालेले रुपये शून्य किंमतीचे ठरतात! तेव्हा विचार करावासा वाटतो पैसा खरच एवढा महत्त्वाचा असतो का ?बरं राहील ह्यात हे सुद्धा दिसतं की प्रसंग एकच पण त्या प्रसंगाच्या वेळी आलेल्या भावना वेगवेगळ्या, हीच रद्दी जेव्हा दुसरी-तिसरीत असताना द्यायचो तेव्हा एक उद्योगपती असल्याचा आनंद !खूप सारी रद्दी जमा करून विकत घेतलेला नवा व्यापार ,पत्त्यांचा कॅट आणि हीच रद्दी आता एक आठवणींचा खजिना ;नंतर उपयोगी पडेल म्हणून एखाद्या मोरपिसा सारखा डायरीत जपलेला !

आपल्या घरातली ‘आजी’ ,आजोबा जर तिच्या आधी गेलेले असतील तर तुम्हाला कदाचित दिसल्या ही नसतील पण एकदा मुद्दाम बघा जुन्या पेटार्‍यामध्ये कुलूपबंद असलेल्या तिच्या आठवणी ,बघा त्यांचा चष्मा पासून ते सुपारी फोडायचा अडकित्ता नक्कीच बघायला मिळेल!.’नंतर उपयोगी पडेल ठेवून दे’ ,असं म्हणून अनेक डबे, थाळ्या असा संसार आई जमवून ठेवते. वर्षानुवर्षे तिथेच पडलेले .असो !या सगळ्यात कळालं ,कशी घुसमट होते ना? दहावीत आपण म्हणत असतो ,चला जाऊ कॉलेजमध्ये मजा करू! पण जसजसे मोठे होत जातो, तेव्हा वाटतं “बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा शेवटी” ,मुक्तछंदमधल्या काही कवितेच्या ओळी म्हणाव्याशा वाटतात ;शेवट करताना !

काहीशी मन नसताना घेतलेली पुन्हा अडगळ साफ
करायला!
वाटलं बस झालं टाकून द्याव्यात सगळ्या आठवणी ;
काही आठवणी जपायच्या होत्या, तर काही आठवणी
टाकाव्याश्या वाटूनही जात नव्हत्या!
कदाचित आपल्या डोक्याला अडगघळीच स्वरूप आलं
असेल!
घट्ट मिटले डोळे.
म्हटले”हे ठेवून देऊया ,नंतर पडेल उपयोगी!”
करकचून बांधल्या गाठोड्याच्या कापडाच्या गाठी !
तिथेच झटकायचा केला प्रयत्न तर पकड त्यांची
आणखीनच होत होती घट्ट !
शेवटी तशीच राहिली अडगळ ,त्याच जागी तिच्या
विजयी मुद्रेने !

Bhavanahttps://learnlooper.com
A girl from konkan region.

10 COMMENTS

  1. Khupp mastt ♥️🤗Tuza lekh vachunn sagl dolyssamor ghadtay Asch vatat hot😇gharoghari matichya chuli..
    Ani lihayla survat keliyes hi savay pn suru thev nantr rather nehmich upyogi padel😚🤗😂

  2. तुझा लेख तरी अप्रतिम आहेतच पण त्यातले सर्वात जास्त आवडले ते म्हणजे तू छोट्यात छोटी गोष्ट ज्या ठसक्यात मांडली आहेस ती तुझी भाषा शैली आणि निरीक्षण शक्ती. मला सुद्धा क्षणभरासाठी का होईना पण माझ्या आयुष्यातले हे क्षण आठवले.
    Keep it up Dear🤗♥️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

One piece under 600 for women

You all know about how girls are craxy about shopping , so here i am introducing with your budget dresses which will...

Top products for cats

we all love cats. We all have cats in our home of various kind, but sometimes we forget about them due to...

Top 5 most useful women’s product !

Top 5 most useful women's products !Hey all womaniyas there! I am going to tell you 5 amazing products that will change...

पांडवकालीन विमलेश्वर

कोकणात बऱ्याच ठिकाणी पांडवकालीन स्थळेआढळतात, याच मालिकेतील देवगड तालुक्यातील वाडा येथे वसलेले पांडवकालीन लेणी वजा विमलेश्वर मंदिर हे...

Recent Comments